लाईट ऑफ लाईफ संस्थेचा पुढाकार
| उरण | वार्ताहर |
लाईट ऑफ लाईफ आणि जेएनपीए व अमेया लॉजिस्टिक्स उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण विभागातील सुमारे 600 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. लाईट ऑफ लाईफ आणि जेएनपीए यांच्या माध्यमातून द्रोणगिरी हायस्कूल करंजा, स्वातंत्रवीर सावरकर विद्यालय नवीन शेवे आणि प्रभाकर नारायण पाटील विद्यालय मोठी जुई ह्या 3 शाळांमध्ये 8वी ते 10वी च्या प्रत्येक विद्यार्थ्यास 12 वह्या, 1 कंपास बॉक्स, चित्रकला वही व आलेख वही इ. शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच तिन्ही शाळांमध्ये 8वी ते 10वी चा संपूर्ण अभ्यासक्रम असलेला इ लार्निंग किट मिनी प्रोजेक्टर ही देण्यात आला.तसेच लाईट ऑफ लाईफ आणि अमेया लॉजिस्टिक्स ह्यांच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन ह्या शाळेत शैक्षणिक साहित्य व दप्तर देण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेच्या आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाच्या व्यवस्थापिका कांचन थोरवे, अलिबाग व उरण विभागाच्या समन्वयिका सारिका राऊत, उरण व पेण विभागाचे सहाय्यक समन्वयक, अमेया लॉजिस्टिक्स देणगीदार राकेश नायर, शाळा सल्लागार समिती अध्यक्ष पिरकोन, शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि 8वी ते 10वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.