| श्रीलंका | वृत्तसंस्था |
भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यांची आणि तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत 27 जुलौपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ लवकरच श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटर धम्मिका निरोशन याची हत्या झाली आहे. मंगळवारी (दि.16) रात्री त्याच्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने निरोशनच्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. निरोशन पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता.