रायगडच्या मुलांची ‘सुवर्ण’ कामगिरी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नुकत्याच संपन्न झालेल्या सातारा स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथील गतका मार्शल आर्ट या राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये रायगड जिल्हा तिसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 270 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये पेणमधील दिया विजय म्हात्रे हिने सुवर्णपदक तर, सेजल दशरथ म्हात्रे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. खोपोलीतील काव्य शेलार, आरुषी अमोल चौधरी, स्वरा स्वप्निल देशमुख, मालविका सुदेवान लहुजी व अपूर्वा कातोरे यांनी सुवर्णपदक तर, हर्षद अरुण गौड व श्रुतीक संतोष गौड यांनी रौप्यपदक पटकावले आहे.
अलिबागमधील वेदिका संतोष कवळे, सोनू नरेश कामी, तन्मयी सुधीर पाटील, मानसी प्रदीप पाटील, प्रणाली बाबासाहेब कांबळे, श्रमिका श्रीधर पाटील, पूर्वा रवींद्र म्हात्रे, जिज्ञासा सुधीर पाटील पेढांबे, किंजल निवास टिवलेकर, स्वरा प्रयाग वारगे, सेजल सचिन पाटील, सानवी संदीप राऊत व आर्य शैलेश माळी यांनी सुवर्णपदक तर तनया किरण मंचेकर, विराट वैभव पाटील यांनी रौप्य पदक पटकावले असून जिज्ञा अजित वर्तक व अंश आल्हाद नाईक यांनी कांस्यपदक पटकावले आहे. याव्यतीरिक्त शौर्य मनोज जावळेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून अर्णव संतोष डुकरे चौथा क्रमांकाचा मानकरी ठरला असून रियार्थ निलेश म्हात्रे व नील जगदीश घरत यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
यावेळी रायगडच्या संघाबरोबर मॅनेजर विश्वजीत पाटील तसेच प्रशिक्षक रोहन गुरव, काजल पाटील, रजिता गौंड होत्या. तसेच, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे हेदेखील मुलांच्यासोबत होते. विजयी स्पर्धकांची 24 ते 27 ऑगस्ट पंजाबमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून रायगडचे खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून नेतृत्व करणार आहेत. या सर्व विजयी स्पर्धकांचे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष नयना शिलधनक यांनी कौतुक केले आहे.







