। माणगाव । प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या पारिजात सेवाभावी संस्था मुंबईच्यावतीने शनिवारी (दि.20) माणगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा विकास कॉलनीतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तरे, वह्या, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी वैभव कदम, विशाल कदम, दयाराम पाटणे, प्रफुल्ल पवार, निलेश थोरे यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या संस्थेने शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थी व पालकांना खूप मोठा आधार दिला. या संस्थेने विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविल्याने संस्थेचे शाळेच्या माजी मुख्याध्यापिका गीतांजली शेळके, नीलम गायकवाड, सुनिता खेमनर, सोनाली कारोटे तसेच पालकांनी विशेष ऋण व आभार व्यक्त केले.