। उरण । वार्ताहर ।
उरण शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एन.आय. स्कूल जवळ राहाणाऱ्या यशश्री शिंदे (22) या तरूणीचा कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा मुस्लिम असून तो बंगलोर या ठिकाणी गेला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरण तालुक्यात अंमली पदार्थांच्या सेवनाने तरुण पिढी भरकटत चालली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच उरण शहरातील यशश्री शिंदे तरुण मूलीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेसंदर्भात सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यशश्री शिंदे या तरूणीच्या हत्येची माहिती आज (दि.27) पहाटेच्या सुमारास उरण पोलीसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मूलीचा विच्छिन्न अवस्थेतील मुत्यूदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनसाठी नेण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशश्री शिंदे हि दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. तसेच, उरण शहराजवळ तीचा मुत्यूदेह आढळून आला असून आरोपी हा मुस्लिम असल्याचे समजले आहे. यावेळी स्थानिक नेते मंडळी तसेच मूलीच्या नातेवाईकांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली आहे. तर, पोलीस या आरोपीला लवकरच लवकर ताब्यात घेणार असून नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.