| आगरदांडा । वार्ताहर ।
मुरूड-आगरदांडा रस्ता करोड रुपये खर्च करून नव्याने बनवला गेला. रस्त्याच्या साईडपट्ट्यांमध्ये माती टाकून बुजवण्याचे काम ठेकेदारांकडून केल्याने पावसात ही माती साईडपट्ट्यांमधून बाहेर आल्याने हा रस्ता वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे आणि साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे या मार्गावरील साईडपट्ट्या व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे.







