। सातारा । वृत्तसंस्था ।
कराडमध्ये प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातुन प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले. यात तिचा मृत्यू झाला.
आरुषी सिंग (21) ही कराडमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकर ध्रृव छिक्कार याने आरुषीला इमारतीवरून ढकलले. यातच तिचा मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी दि. 30 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात ध्रृव छिक्कारावर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.