| कोलाड | वार्ताहर |
कोणत्याही मोबाईलवरून सुरुवातीला 140 वरून सुरु होणार्या क्रमांकावरून फोन आला तर तो फोन उचलून सर्व नागरिकांनी आपली माहिती देऊ नये, नाहीतर आपला बँक बॅलन्स झीरो होऊ शकतो. याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या मोबाईलवर सुरुवातीला 140 पासून सुरु होणार्या 911409320671, 911409320661, 911409320589, 911409320655, 911409320264 या मोबाईल नंबरवरून कॉल आला तर उचलून आपल्या अकाऊंट नंबर, गुगल पे नंबर सांगू नका. कारण, यामुळे आपला अकाऊंट नंबरवरुन सर्व रक्कम काढून घेतली जाऊन आपले बँक खाते झीरो होऊ शकते. यामुळे आपण याला बळी न पडता अशा कॉलपासून जागरुक राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.