महाड | प्रतिनिधी ।
बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात नववीत शिकणाऱ्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यु झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढालकाठी पुलानजिक हा अपघात झाला. जखमी मुलांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
शुभम रमाकांत झांजे (वय १५, रा. आकले ता. महाड ), विशाल हरेंद्र यादव (वय १६ , रा. आदर्श नगर बिरवाडी ) आणि आदित्य विजय घाडगे (वय १६, रा. ढालकाठी ) हे शालेय विद्यार्था विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन जात असताना ढालकाठी पुलानजिक ही दुचाकी घसरुन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात शुभम झांजे याचा जागीच मृत्यु झाला. तर आदित्य याचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच विशाल जखमी झाला असून बेशुद्धावस्थेत आहेत. त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरु होते.