| अलिबाग | वार्ताहर |
कर्जतमधील शाळेसमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत मासळी बाजारात इंग्लिश मिडीयम स्कूलसमोर कल्याण नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी (दि. 6) दुपारी 3 च्या दरम्यान छापा टाकून एक हजार 255 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक नागरभोजे करीत आहेत.






