| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरियाणाची कुस्तीपटू अंतिम पंघाल आणि तिची बहीण वादात सापडली आहे. दोघींनाही पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. यानंतर दोघींनाही तातडीने पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले. खरं तर, महिलांच्या 53 किलो वजनी गटातील सामन्यात पहिला सामना गमावल्यानंतर अंतिम पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आणि हॉटेलमध्ये गेली. जिथे तिचे प्रशिक्षक विकास आणि भगतसिंग हेदेखील थांबले होते.
अंतिम पंघालने आपल्या बहिणीला ओळखपत्र दिले आणि तिला स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये जाऊन सामान आणायला सांगितले. तिची बहीण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली, परंतु बाहेर पडताना सुरक्षा कर्मचार्यांनी तिला पकडले. तिचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 19 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन अंतिमलाही पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. एवढेच नाही तर तिचे वैयक्तिक सहाय्यक कर्मचारी विकास आणि भगत हे कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत कॅबमध्ये प्रवास करत होते आणि भाडे देण्यास नकार देत होते. त्यानंतर चालकाने पोलिसांना बोलावले.
आयओएच्या एका अधिकार्याने सांगितले की, आम्ही अजूनही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची परिस्थिती वाईट आहे, आमचे सुरक्षा अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत. त्यांना डिपोर्ट केले जाऊ शकते, पाहूया. तथापि, ने शिस्तभंगाबाबत काहीही सांगितले नाही.बुधवारी झालेल्या सामन्यात अंतिम पंघाल तुर्कीच्या यतगिल झेनेपकडून 10-0 ने पराभूत होऊन पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. ऑलिम्पिक पदार्पण करणार्या खेळाडूच्या रिपेचेजद्वारे कांस्यपदकाच्या शर्यतीत राहण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत झेनेपला जर्मनीच्या अॅनिका वेंडलकडून पराभव पत्करावा लागल्याने या आशा संपुष्टात आल्या.







