गणेशोत्सवाआधी उद्घाटनाची प्रतीक्षा
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून येत असतात. याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी मुरुड समुद्रकिनारा सुशोभिकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. एकाच वेळी 400 वाहने उभी राहू शकतील, असा वाहनतळ तयार करण्यात आला असून, सोनेरी सूर्यास्त होताना किनार्यावर बसून पाहता येणार आहे. गाडी पार्किंग करून चार पावले चालताच मऊ वाळूत जाता येणार आहे.
मुरुड समुद्रकिनारा सुंदर असून, या ठिकाणी पर्यटकांना सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. पर्यटकांच्या दृष्टीकोनातून मुरुड समुद्राकिनारा सुशोभिकरण केल्याने मुरुडमध्ये पर्यटकांची संख्येत नक्कीच वाढ होईल. यामधून स्थानिकांना चांगला रोजगार जगार मिळेल. या नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मुरुड समुद्रकिनारा सुशोभिकरण करण्याकरिता 11 कोटी 43 लाख 12 हजार 716 रुपये मंजूर करण्यात आले होते. या निधीतून सुशोभिकरण, वॉक वे, फुड जॉईट करणे, वाहनतळ व अनुषंगिक सुविधा करणे आदी सुविधांचा समावेश आसणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून यामधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध सुविधा उभारण्यात आला आहे. हंगामात हजारो पर्यटक आले तरी त्यांना हॉटेलसमोर पार्किंग मिळणार आहे. समुद्र पाहता-पाहता कोकणी खाद्य संस्कृतीचा आनंद घेत येणार आहे.
मुरुड समुद्रकिनारी असलेली हॉटेल गणपती सुट्टीसाठी सज्ज झाली आहेत. समुद्रकिनारी असलेले नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टॉल्स, किनार्यावरील घोडसवारी, मोटार बाईक, पाणीपुरी, भेळपुरी अशा विविध स्टॉल्सने किनारा बहरला आहे. नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्राम धाम या बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ येणार्या पर्यटकांना होणार आहे. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून तीन वेळा स्वच्छ करतात, मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत. मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, पर्यटकांसाठी मुरुड तालुका सज्ज आहे.







