। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए प्राधिकरण सीएसआर फंडातून जसखार ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. त्याचे भूमीपूजन सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जेएनपीए ट्रस्टी दिनेश पाटील व शिवसेना नेते मधुकर ठाकूर यांनी सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी जेएनपीए प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शाखाप्रमुख सुभाष तांडेल, सदस्य राकेश तांडेल, राहुल ठाकूर, किशोर ठाकूर, उप शाखाप्रमुख बबन ठाकूर, युवा सेना अधिकारी संदीप ठाकूर, केतन घरत, योगेश म्हात्रे आदी उपस्थित होते. यामुळे जसखार गावचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.







