। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील नामांकित असे पोटे मसालेचे संस्थापक हरिभाऊ नारायण पोटे यांनी सोमवारी (दि. 12) वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पोटे कुटुंबीय हे पनवेलमधील अत्यंत जुने कुटुंबिय. एकूण हे सहा भाऊ होते. त्यापैकी 5 भावांचे यापूर्वीच निधन झाले असून आज त्या भावांपैकी लहान असलेल्या हरिभाऊ पोटे यांनी पनवेल शहरातील निरामय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 75 वर्षे पूर्वी त्यांनी मिरची गल्ली येथून पोटे मसाले हा व्यवसाय सुरू केला व आजमितीस पोटे मसाले हा आता पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा असा मसाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.






