सापळा रचून वनविभागाने घेतले ताब्यात
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
c 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडूळ जातीच्या सापांना संरक्षण देण्यात आले आहे. गुप्त धनाच्या लालसेपोटी या सापाची तस्करी करण्यात येते. या तस्करी प्रकरणी सापळा रचून चिपळूण तालुक्यातील महादेव जयराम महाडिक व अनिल तुकाराम कदम तसेच रिक्षाचालक लक्ष्मण हिरू चाळके यांना ताब्यात घेतले आहे.
या तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,48,50,51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी चिपळूणच्या परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर करीत आहेत.







