। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अत्यंत रंजक निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समसमान जागा तर काँग्रेस शुन्यावर बाद झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या पदरी मात्र निराशा आली आहे. तर वाडा पंचायत समितीत शिवसेनेला एकच जागा मिळाली आहे. विक्रमगड जिल्हा परिषदेत भाजपला एक, मोखाडा जिल्हा परिषदेत शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष निवडून आला आहे. तर पालघर जिल्ह्यात काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही.
एकूण 14 जागांचे निकाल हाती
पालघर जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात शिवसेनेला सर्वाधिक 5, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 4 आणि माकपला एका जागेवर विजय मिळाला आहे.
युतीचा प्रयत्न फसला
पालघरमध्ये मनसे आणि भाजपमध्ये युती झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत होतं. मात्र या निवडणुकीत भाजप-मनसे युतीचा प्रयत्न फसला आहे. वाडा येथील सापणे पंचायत समितीत भाजप-मनसे युती होती. मात्र, या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.





