। महाड । वार्ताहर ।
अनिकेत समर्थ ग्रुपतर्फे नोव्हेंबर महिन्यात महाड प्रिमियर लीग 2021 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती ग्रुपचे
अध्यक्ष आशिष चिखले यांनी दिली. आयपीएलच्या धर्तीवर महाडमध्ये अनिकेत समर्थ ग्रुपतर्फे महाड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे नोव्हेंबर महिन्यात चांदे क्रीडांगण येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता 16 संघ असणार आहेत, त्यासाठी 16 संघमालकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क साधावा असे यावेळी ग्रुपतर्फे सांगण्यात आले आहे. या स्पर्धे करिता प्रथम पारितोषिक 50 हजार रूपये, द्वितीय 30 हजार रूपये, तृतीय 20 हजार रूपये, चतुर्थ 20 हजार रूपये असून इतर वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी आशिष चिखले 9850501314, राहुल कदम 7755996825, सुरज करकरे 7709272550, आदील सय्यद 8983430606 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.