। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील मधला पाडा येथे माणुसकी प्रतिष्ठान व लायन्स हेल्थ फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, रक्तदाब, रक्ततपासणी, डोळे तपासणी व मल्टिपल मेडिकल चेकअप कॅम्प घेण्यात आला. यावेळी 136 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 115 महिलांच्या गर्भाशयाची तपासणी करण्यात आली. तर 23 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी रिजन चेअरपर्सन विजय वनगे, निहा राऊत, कला पाटील, डॉ. किमया थळे, डॉ. काळे, डॉ. हुलवान व त्यांचे सहकारी यांच्यासोबत सरपंच नासिकेत कावजी, संदेश पाटील, राखी गुरव, सायली कावजी, विलास वालेकर, नरेश गोंधळी, विनोद पाटील, माची/वाघोडे आदिवासी बांधव-भगिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर गुरव, मंगेश घरत, मयुरी घरत, केतन कवळे, रोहीत पाटील, सुनिल नाईक, सुप्रिया नाईक, रेश्मा पाटील, रेश्मा नाईक, समिक्षा गुरव, स्वराज गुरव, अनिल घरत, अशिष थळे, प्रणित घरत, अवदुत थळे, दक्षणा वेळे, पालवी स्वयंसहायता महिला बचत गट या सर्वांनी मदत केली. तसेच, कार्यक्रमाचे नियोजनपूर्वक मार्गदर्शन संतोष गुरव यांनी केले.