। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आणि महाविकास आघाडीला लोकांची पसंती वाढत चालल्यामुळे खारघरमधील अल्पसंख्याक समुदायाचे आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली साकिब खान, रशीफ खान, बिलाल मंसूरी जावेद खान, आसिफ मुकादम, अब्दुल कलाम, अब्दुल सलाम आदींच्या बरोबरीने शेकडो मुस्लिम युवकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश करण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवेंद्र मढवी, खारघरचे समाजसेवक बिलाल पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आसिफ खान यांनी सांगितले. आमचे गेल्या दहा वर्षात खूप नुकसान झाले. याच कारणामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेश करत आहोत. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले, आज आपण जो पक्ष प्रवेश केला आहे तो किती योग्य आहे हे थोड्याच दिवसात कळेल आणि शेतकरी कामगार पक्षांमध्ये आपल्याला सन्मानजनक वागणूक मिळेल याची गाव्ही देतो. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी गणेश कडू, देवा पाटील, देवेंद्र मढवी, बिलाल पटेल, रा. गो. पाटील, अजित अडसूळे, प्रतीक ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.







