। रसायनी । वार्ताहर ।
सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सुरेश धोंडजीराव कदम यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. चौक परिसरातील अग्रगण्य कलोते विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे ते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नेताजी पालकर भात गिरणी चौकचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई, मुलगे सुहास आणि सचिन तर मुलगी सुवर्णा असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला परिसरातील सर्व क्षेत्रातील जनसागर लोटला होता.