। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेले फाटक हे दुरुस्तीच्या कामासाठी 26 सप्टेंबरपासून बंद आहे. पाच दिवस फाटक बंद असल्याने नेरळ पूर्व आणि पश्चिम भाग यांचा संपर्क तुटला असून, नेरळ गावात एका बाजूला असलेल्या शाळांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल फाटक बंद असल्याने झाले. 30 सप्टेंबर रोजी फाटकातील दुरुस्तीची कामे मध्य रेल्वेकडून पूर्ण झाली तरी, नेरळकरांचे हाल हाल झाले. नेरळ या मध्य रेल्वेवरील जंक्शन रेल्वे स्थानकांच्या पुढे कर्जत दिशेकडे मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 86 किलोमीटर अंतरावर असलेले फाटक क्रमांक 21 आहे. या फाटकातून दररोजये-जा करणार्या वाहनांची संख्या हजारांमध्ये आहे. नागरिकही याच मार्गाटा वापर करतात. दुरुस्तीसाठी फाटक बंद असल्याने हाल झाले.







