। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून गेली कित्येक दिवस आझाद मैदानावर शिक्षकांच्या न्याय वेतनाच्या मागण्यासाठी हुंकार आंदोलन सुरू होते. मात्र, गुरुवारी (दि.10) आंदोलनाच्या 56व्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत शासनाने अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना अनुदानाचा टप्पा मंजूर करून खर्या अर्थाने शिक्षक बांधवांची विजयादशमी साजरी केली. मात्र, अंशतः अनुदानित शिक्षक शासन निर्णय निर्गमनाच्या प्रतीक्षेत होता.शिक्षक समन्वय संघाचे के.पी. पाटील आणि राहुल कांबळे यांनी जो पर्यंत शासन निर्णय हातात येत नाही, तो पर्यंत हुंकार आंदोलन सुरू राहणार, असा निर्धार करून आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. आंदोलनाच्या 60व्या दिवस म्हणजेच सोमवार दि.14 हा दिवस महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी हक्काच्या वेतनाचा दिवस ठरला. कारण या दिवशी आपल्या हक्काचा पगार मिळणारा असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.