। उरण । वार्ताहर ।
यु.ई.एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या एनएसएस आणि डीएलएलई व मतदान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे गुरुवारी (दि.24) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जगजीवन भोईर यांनी विद्यार्थ्यांना नवीन मतदार ओळखपत्राची नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कशी करायची याची प्रक्रिया सांगितली. तसेच, मतदानाच्या अधिकाराविषयी जागरूक होण्यासाठी मार्गदर्शन केले. यानंतर विदयार्थ्यांनी निवडणूक जनजागृतीची शपथ घेतली. या कार्यक्रमाला सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख, शिक्षक आणि एकूण 58 विदयार्थी उपस्थित होते.