स्टार फलंदाज ठरले अपयशी
। मॅके । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलिया दौर्यातील भारत ’अ’ व ऑस्ट्रेलिया ’अ’ यांच्यातील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली, असून ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवसापासून आपले वर्चस्व दाखवण्यास सुरूवात केली आहे. भारतातील अवघ्या 3 फलंदाजांना 2 आकडी धावसंख्या करता आली. पण कोणालाही अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. ब्रेंडन डॉगेटने भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव अवघ्या 107 धावांवर गुंडाळला.
भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह 3 भारतीय फलंदाज शुन्यावर बाद झाले. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन 7 धावांवर बाद झाला, तर इंद्रजित 9 धावा तर इशान किशनला 4 धावा करता. यानंतर साई सुदर्शन 21 धावा, देवदत्त पडिकल 36 धावा व नवदीप सैनीने 23 धावांचे योगदान दिले. यामध्ये ब्रेंडन डॉगेट याला भारताचे 6 खेळाडू बाद करण्यात यश आले. त्याला जॉर्डन बकिंगहॅमने 2 बळी घेत साथ दिली, तर फर्गस ओ’नेल व टॉड मर्फी यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. यामुळे भारताचा डाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 107 धावांवर गुंडाळण्यात यश आले. यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे 99 धावांवर चार गडी बाद करण्यात भारताला यश मिळाले आहे. यात ऑस्टे्रलिया संघाचा सॅम कान्स्टस (0), मार्कस हॅरिस (17), कॅमरॉन बँक्रॉफ्ट (0) व बीऊ वेब्स्टर यांचा समावेश आहे. तर, दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नेथन मॅकस्विनी (29) व कूपर कॉनोली (14) हे मैदानवर होते. यावेळी भारताच्या मुकेश कुमार व प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत.