| पनवेल | वार्ताहर |
अति वेगाने मोटार सायकल चालविल्याने झालेल्या दोन मोटार सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.
आर-5 करंजाडे येथील रस्त्यावर अॅक्टीव्हा मोटार सायकलवरील चालकाने हिरो कंपनीच्या मोटार सायकलीस धडक मारुन झालेल्या अपघातात सुरज विश्वकर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.