। पाली/वाघोशी । वार्ताहर ।
सह्याद्री शिक्षण संस्था पेडलीच्या वाघोशी माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली वाघोशी विद्यालय ते वाघोशी गाव अशी आयोजित करण्यात आली होती.
या रॅली दरम्यान मतदान जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा’, ‘मतदान करू या, लोकशाही वाचवू या’, ‘निर्भय होऊन मतदान करा, आपली जबाबदारी पार पाडा’ अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. तसेच, पथनाट्य देखील सादर करण्यात आली. या रॅलीत मुख्याध्यापक राजेश गोळे, माजी सरपंच शशिकांत देशमुख, मुख्याध्यापक शिविराम आडे, सुजाता देशमुख, विठोबा देशमुख, मारूती कोल्हाटकर, आत्माराम देशमुख, शिक्षक नरेश शेडगे, सुजाता गोळे, विकास निकम, संतोष गायकवाड यांनी मतदान जनजागृती रॅलीत सहभाग घेऊन 20 नोव्हेंबरला सर्वांनी मतदानचा हक्क बजावावा, अशी विनंती करण्यात आली.