| पनवेल | वार्ताहर |
एका बंद दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 25 हजारांचे साहित्य लंपास केल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे. रजत ठाकूर यांचे खारघर वसाहतीत आईस्क्रीम वर्क या नावाचे दुकान असून, त्यांच्या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी वाकवून दुकानातील लॅपटॉप व रोख रक्कम असा मिळून जवळपास 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.