। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
पालीतील ओसवाल प्लाझा फेडरेशन तर्फे मिशन कवच कुंडल अंतर्गत मंगळवारी (ता.12) कोविड लसीकरण अभियान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या उपक्रमामुळे ओसवाल प्लाझा ही कोविड लसीकरण पूर्ण केलेली तालुक्यातील पहिली सोसायटी झाली आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांनी केले. यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे, ओसवाल प्लाझा सोसायटी अध्यक्ष चिंतामणी खोडागळे, कार्याध्यक्ष विद्यानंद अधिकारी, उपाध्यक्ष अशोक महामुनी, सचिव महेंद्र जाधव खजिनदार भागवत खेडेकर व सदस्य उपस्थित होते.