| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथे तेजस एक्स्प्रेस रेल्वेची धडक लागून अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. च्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील स्टोन क्र. 31/1 ते 31/2 मध्ये डाऊन मार्गावर रेल्वे रुळावरती प्लास्टिक बाटल्या उचलत असताना तेजस एक्स्प्रेस ट्रेन क्र. 22119 ची अनोळखी इसमास ठोकर लागली. या अपघातात मयताच्या डोक्यास तसेच दोन्ही हातापायाला, शरीराला गंभीर दुखापत होऊन शरीराचे तुकडे झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि. निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. राठोड करीत आहेत.