। नागपूर । प्रतिनिधी ।
मेहकर जालना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बीबी दुसरबीड रोडवर रुग्णवाहिका आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
बीबी दुसरबीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि. 03) रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला. अक्षय आडे हे रुग्णाला सोडून बिबीकडून दुसरबीडकडे जात होते. दरम्यान, बीबी दुसरबीड मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आले असता भरधावर ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालक अक्षय आडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालक राजेश्वर वाकळे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बीबी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच, याप्रकरणी पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत.