। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केगाव-दांडा येथील 13 वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमसाठी सज्ज झाला आहे. हा जागतिक विक्रम तो बुधवारी (दि.18) करणार आहे. यावेळी आर्य धरमतर जेट्टी ते कासा खडक हे 24 किमीचे सागरी अंतर तो ‘बटरफ्लाय’ या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे. त्यामुळे असे करणारा आर्य हा जगातील पहिला बाल जलतरणपटू ठरणार आहे.
आर्य उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेनट स्कूलमधील आठवी इयत्तामध्ये शिकत आहे. बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार आहे. आर्य या विक्रमासाठी उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगरपरिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज सहा तासांचा सराव करत आहे.