| पनवेल | वार्ताहर |
ट्रेडींग ॲपमध्ये खाते खोलायच्या बहाण्याने कामोठे उपनगरातील एका 66 वर्षीय जेष्ठ नागरिकाला तब्बल 25 लाख 85 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा चोरट्यांनी घातला आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कामोठे परिसरात सेक्टर 20 येथील एव्हीन्युव सोसायटीत 66 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी राहतात. त्यांना ऑनलाईन भामट्यांनी 3 ऑक्टोबरपासून ते 16 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधून ट्रेडींग ॲपवर खाते खोलून ट्रेडींग केल्यास जास्त नफा मिळेल असे सांगितल्यामुळे पिडीत जेष्ठ नागरिकानी जास्त नफा मिळेल या आमिषाने आर.जी.ए.आर.ए. या ॲपवर खाते उघडले. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन पिडीत जेष्ठांना संपर्क साधण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी सांगीतले. परंतू वेळोवेळी मागणी करुनही नफा न मिळाल्याने मूळ रक्कम परत करण्याची मागणी केल्यानंतर ऑनलाईन भामट्यांचे मोबाईल क्रमांक बंद झाल्याने या जेष्ठांनी कामोठे पोलीसांना संपर्क साधला.