। चाणजे । वार्ताहर ।
पोस्टखाते हे देशाच्या विकास कार्याला बळकटी देणारे अत्यावश्यक खाते आहे. यामुळे पोस्टाचे कामकाज सुरक्षित व स्तुस्थितीत असलेल्या जागेत असायला पाहिजे. मात्र, स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली तरीदेखील उरण तालुक्यातील पोस्ट कार्यालयासाठी इमारत नाही. यामुळे आजपर्यंत पोस्टाचे कामकाज भाड्याच्या तेही मोडकळीस आलेल्या धोकादायक जागेत होत आहे. मोडकळीस व धोकादायक इमारतीत कामकाज होत असल्याने कर्मचारी व पोस्टात येणार्यां लोकांच्या जीवाला धोका होण्याची भीती वाटत आहे. सरकारने उरण पोस्ट कार्यालयाच्या जागेची पाहणी करून, उरण तालुका शेकापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत यांनी सुचित केल्यानुसार उरण पोस्ट कार्यालयासाठी स्वत:च्या मालकीची इमारत उभी करावी, अशी मागणी उरणवासियांनी केली आहे.