| पनवेल | वार्ताहर |
एनएमएमटी बसची एका 70 वर्षीय महिलेला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बारवई गावाजवळ घडली आहे. यमुना पवार (70) या किर्तन आटोपून घरी येत असताना बारवई गावालगतचा रस्ता ओलांडत असताना भरधाव एनएमएमटी बसने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीररित्या जखमी होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.