। कर्जत । वार्ताहर ।
सध्या बाजारात हंगामातील पहिले वालाचे आणि तुरीचे पीक दाखल झाले आहे. त्यामुळे कर्जत ग्रामीण भागात पिकणारा वालाच्या आणि तुरीच्या शेंगा कर्जत बाजार पेठेत विक्रीसाठी आलेल्या दिसत आहेत.
कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर शेतकरीही भात पिकाबरोबर आपल्या शेतामध्ये पालेभाज्या आणि अन्यभाज्यांची लागवड करत असतात त्यामुळेच कर्जत शहराच्या बाजारपेठेमध्ये आता वांगी, कारली, पालक, मेथी, दुधी भोपळा, शिरळी घोसाळी, मिरची, कोथिंबीर आदींसारख्या भाज्यांची विक्री होताना दिसत आहे त्याच बरोबर पावटा, वाल आणि तुरीच्या शेंगा यांचीही विक्री जोरात सुरु आहे. पोपटीच्या आयोजनाच्या तयारीसाठी लागणारे वालाच्या शेंगा मार्केटमध्ये उपलब्ध झाल्यामुळे त्यांना मागणी आहे.
बाजारात आलेले वाल की पावटे ?
बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेंगा वाल की पावटे या संभ्रमात आहेत मात्र जे खाणारे आणि ओळखणारे दर्दी आहेत, त्यांना पावटे आणि वालाच्या शेंगांमधला फरक जाणवतो आणि तेच खरेदी करताना पहिली पसंती वालाच्या शेंगांना देतात कर्जत शहराच्या बाजारपेठेत कुमार गायकवाड विक्री करत असलेल्या वालाच्या आणि तुरीच्या शेंगांचे सध्या भाव कडक असल्याचे सांगतात.