। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने मनाली-लेह महामार्ग बर्फवृष्टीमुळे दोन दिवस बंद करण्यात आला आहे. उपायुक्त लाहौल यांनी सांगितले की, बारालाच्या माथ्यावर सुमारे दोन फूट बर्फ आहे, तो वितळण्यास कमीत-कमी 48 तास लागतील. या बर्फवृष्टीमुळे रोहतांग खिंडीत पुन्हा एकदा बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. शिवाय, बारालाचा, कुंजूम पास, मनाली, लाहौल-स्पीती, धौलाधार आणि चंबा या शिखरांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असून पर्यटकांना रोहतांग खिंडीत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.