। रसायनी । वार्ताहर ।
भारतीय जनतेची सेवा करणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे. प्रत्येक गावात, घरात भारतीय लष्कराचा सैनिक तयार झाल्यास प्रत्येकाला देश सेवा करण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन सुभेदार मेजर किसन कदम यांनी चौक गावंढळ येथे केले आहे.
नाईक विजय कदम यांनी 5 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या 225 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील 5 मराठा लाईटमधील सेवा निवृत्त अधिकारी, लष्करी जवान यांना एकत्र आणून खालापूर तालुक्यातील जांब्रुक वावंढळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गावचे कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, सुभेदार मेजर किसन कदम बोलत होते. दरवर्षी हा कार्यक्रम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो, असे नाईक विजय कदम यांनी सांगितले.
यावेळी सुभेदार मेजर सचिन आम्रे, हवा. रमेश जाधव, हवा. हेमंत पांगळे, ना. सुरेश ठमके, निवृत्त लष्करी जवान यांच्यासह गावातील लष्कर जवान रामचंद्र कदम, पांडुरंग कदम यांच्यासह जेष्ठ नागरिक शिवरामराव कदम, यशवंतराव कदम, पांडुरंगराव कदम, बळीराम कदम, भिकाजी महाराज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







