। रायगड । खास प्रतिनिधी ।
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना चेस इन स्कूल (शाळेत बुद्धिबळ) हा उपक्रम 2025-26 पासून सुरु करणार आहे. रायगडमध्ये बुद्धिबळ वाढावा असे वाटते त्यांनी या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेवून चेस ट्रेनर पदवी घ्यावी. तसेच आपल्या जवळच्या किमान दोन शाळांमधून हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा आहे. रायगडमध्ये 12 जानेवारी 2025 रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे.
भारतामध्ये सध्या बुद्धिबळ या खेळाने चांगलाच जोर पकडला आहे. आपल्याकडील मुलेही मागे पडणार नाहीत. याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण जर बुद्धिबळप्रेमी आहोत तर आपली जबाबदारी आहे की या खेळाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच याचाच एक भाग म्हणून शाळेत बुद्धिबळ हा उपक्रम या वर्षी जून 2025 पासून 500 शाळांमधून राबविण्यात येत आहे. त्यासाठी बुद्धिबळ ट्रेनरची आवश्यकता असल्याने ट्रेन द ट्रेनरस या कॅम्पमार्फत बुद्धिबळ ट्रेनर्स ही पदवी देवून प्रशिक्षक तयार करण्यात येणार आहेत. किमान एक-दोन शाळेतून बहुसंख्य विद्यार्थ्यांना खेळात आणतील.
या प्रशिक्षणाचा भाग होऊन आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहिती साठी 8888011411 विलास म्हात्रे अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा.