• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चुकीच्या औषधांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; आरोग्य विभागावर कारवाईची मागणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 2, 2025
in sliderhome, आरोग्य, कर्जत, रायगड
0 0
0
चुकीच्या औषधांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; आरोग्य विभागावर कारवाईची मागणी
0
SHARES
465
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| कर्जत | संतोष पेरणे |

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणार्‍या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पूर्वी कोणताही आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरविण्यात आले. त्याबाबत आरोग्य विभागाने त्या मुलीच्या पालकांना कळविले नाही, तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातूनदेखील मुलीच्या पालकांना कळविले नाही. दरम्यान, चुकीची औषधे घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोड्या आल्या, तिचे हातपाय सुजले आणि अत्यवस्थ झाली असून, तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पेण तालुक्यातील वरवणे येथे असलेल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये तेथील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आय.पी.एच.एस. उपकेंद्र वाकरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत 16 डिसेंबर 2024 रोजी शिबीर घेतले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम 16 डिसेंबर 2024 रोजी कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियान शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील निवासी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली खुशबू नामदेव ठाकरे या विद्यार्थिनीचे अंगावर तीन चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी असल्याचे निदान केले. त्याबाबतची माहिती देणारे पत्र आरोग्य विभागाकडून 16 डिसेंबर किंवा त्यानंतर शासकीय आश्रमशाळा यांना देण्यात आले नाही. त्याबाबत त्या मुलीच्या पालकांना कल्पना देणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी ठरविण्यात आलेल्या खुशबूला कुष्ठरोग निर्मूलनबाबत गोळ्या 18 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या. तपासणी शिबीर आणि गोळ्या सुरु झाल्यानंतर 28 डिसेंबरपर्यंत नामदेव ठाकरे यांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे, याबाबत कोणतीही माहिती नव्हती. खुशबूची मोठी बहीण याच शाळेत शिकत होती. ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी नामदेव ठाकरे आश्रमशाळेत आल्यावर खुशबू आजारी असल्याचे कळले.

खुशबूला ताप येत असल्याने तिला नामदेव ठाकरे यांनी आपल्या घरी तांबडी येथे नेले. त्यावेळी घरी नेल्यावर शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या तिचे पालक देत होते. मात्र, त्या कसल्या गोळ्या आहेत याची पुसटशी कल्पना नामदेव ठाकरे यांच्या कुटुंबाला नव्हती. 3 जानेवारी रोजी पालकाने आपल्या मुलीला पुन्हा आश्रमशाळेत सोडले. मात्र, कोणताही आजार नसलेल्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्या दिल्या जात असल्याने त्याचा साईड इफेक्ट खुशबूच्या शरीरावर दिसून येऊ लागला. तिच्या अंगावर फोड्या उठल्या, तसेच हातापायांना सूज येऊ लागली. ही बाब 10 जानेवारीनंतर खुशबूचे अंगावर दिसून येऊ लागल्यावर नामदेव ठाकरे यांना आश्रमशाळेत बोलावून घेण्यात आले. त्यावेळी पालकांच्या सोबत खुशबूला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तेथे खुशबू हिची प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. पनवेल येथे 16 जानेवारी रोजी नेण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कोणी दिल्या आणि त्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांच्याकडून दिल्या जात होत्या. मात्र, त्यांनी आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांच्याकडून पालकांना तुमची मुलगी कुष्ठरोगी आहे याची कल्पना दिली नव्हती.

16 जानेवारी पासून पनवेल येथील एमजीएम रुग्णलयात उपचार घेत असलेली खुशबू हिचे 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यलयाने दुसर्‍याच दिवशी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु, त्या कारणे दाखवा नोटिसीला तीन दिवसात कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यलयाने शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातून प्रकल्प अधिकारी आत्मरं धाबे हे देखील एका निरपराध मुलीच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.


आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता. तिच्या चेहर्‍यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. कुष्ठरोगाचे नव्हते. त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानामुळे एका निरपराध मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. त्यात तिच्या लिव्हरमध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज हे लक्षण चुकीच्या उपचारामुळे आली होती. माझ्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे, मला मुख्याध्यापक किंवा अधीक्षिका यांनी सांगितले नाही. ते सांगण्याची तसदी शासकीय आश्रमशाळेच्या घेतली नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी.

नामदेव ठाकरे,
दुर्दैवी मुलीचे वडील


संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुम ही कुष्ठरोगाला रोखण्यासाठी राबवली जाणारी मोहीम असून, या मोहिमेतून कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचार उपलब्ध करून देणे हा उद्दिष्ट आहे. परंतु, कुष्ठरोग नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानाला गालगोट लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खुशबूच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी.

जैतू पारधी,
आदिवासी कार्यकर्ते, कर्जत


आमच्या शाळत कुष्ठरोग निर्मलनाबाबत शिबीर झाले आणि त्यात एका मुलाला कुष्ठरोगी ठरवले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेले.

अजित पवार,
मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे


प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबूला गोळ्या देण्यास सांगितले, त्याप्रमाणे मी दररोज दोन गोळ्या झोपण्याआधी देत होते. नंतर तिला ताप आल्यानंतर दोन गोळ्या देण्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली. तिचे पालक शाळत आले आणि घरी घेऊन गेले, त्यावेळी त्यांना दररोज ही गोळी एक द्यायची आहे असे सांगितले.

सुवर्णा वरगने,
अधीक्षक, शासकीय आश्रमशाळा, वरवणे


शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील मुलीला कुष्ठरोग झाला असून, तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी स्वतः रुग्णालयात गेलो होतो. 22 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आत्माराम धाबे,
प्रकल्प अधिकारी, पेण आदिवासी प्रकल्प


शासनाच्या निर्देशानुसार आम्ही आश्रमशाळेत कॅम्प आयोजित केला होता. तेथे एक विद्यार्थिनीला कुष्ठरोग असल्याचे आढळून आले. त्या दिवशी आमच्याकडे गोळ्यांची पाकिटे नव्हती आणि त्यामुळे लगेच गोळ्या सुरू केल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी सदर मुलीच्या नावाचे लेबल केल्यावर 18 डिसेंबरपासून उपचार सुरू केले.

डॉ. नेत्रा पाटील,
वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र

Related

Tags: Demand for action against the health departmenthealth departmentindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPen Government Ashram Schoolraigadsocial media newssocial newsStudent's death
Previous Post

स्टील चेंबरचे संचालक मंडळ बरखास्त

Next Post

आरटीई प्रतिपूर्तीचा निधी थकीत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पालीत महास्वच्छता अभियान
रायगड

पालीत महास्वच्छता अभियान

March 1, 2026
तळा

रानमेव्यामुळे सणासुदीत आर्थिक दिलासा

March 1, 2026
कर्जत तालुका झाला कचरा मुक्त
कर्जत

कर्जत तालुका झाला कचरा मुक्त

March 1, 2026
ग्रामीण भागात डोंगरांना वणवे
महाड

ग्रामीण भागात डोंगरांना वणवे

March 1, 2026
चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात
अलिबाग

चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात

March 1, 2026
खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास
रायगड

खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास

March 1, 2026
Next Post
आरटीई प्रतिपूर्तीचा निधी थकीत

आरटीई प्रतिपूर्तीचा निधी थकीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?