। कर्जत । प्रतिनिधी ।
जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने सेंट विल्फ्रेड पनवेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल सायन्स आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ यांच्या सौजन्याने कर्जतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रायांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, पनवेलचे छ. शिवाजी महाराज विद्यापीठ, तसेच छ. शिवाजी महाराज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन डॉ. ऋतुजा पाटील यांचा मार्गदर्शनाखाली लोकांच्या विविध चाचण्या करून जनजागृती केली. हे शिबीर मोफत असून, जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. या शिबिरासाठी सेंट विल्फ्रेड कॉलेज पनवेलचे अॅडमिशन हेड सिद्धेश खानविलकर, तसेच त्यांचे सहकारी प्रतीक दांडेकर आणि निखिल चाफेकर यांचे सहकार्य लाभले.







