। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवस मार्गावरील मानीफाटा येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये नवेदर बेली येथील पती पत्नी जागीच ठार झाले. विश्वास पाटील (48) व कल्पना पाटील (42) असे या पती, पत्नीची नावे आहे. शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे व शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी (दि.25) पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कायम पाठीशी असणार, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या झालेल्या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले. पाटील कुटुंबियांची सांतवनपर भेट घेऊन त्यांचा मुलगा व कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व शेकाप पाठीशी राहील, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






