| उरण | वार्ताहर |
हवामान विभागाने खराब हवामानाचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे उरणची मोरा ते मुंबई जलसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना अखंडित मिळावी आणि वेळेत पोहोचता यावे यासाठी उरणच्या मोरा ते मुंबई येथील भाऊचा धक्का यादरम्यानची जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू ठेवली जाते. गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतितास 49 ते 50 या वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जलवाहतुकीच्या दरम्यान धोका पोहोचून अपघात होऊ नये, यासाठी हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. इशारा संपल्यानंतर सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.







