| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब अलिबागच्या अध्यक्षपदी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक यांची निवड करण्यात आली. अलिबागमधील क्षात्रैक्य समाज सभागृहात कार्यकर्तृत्व शपथ विधी सोहळा पार पडला. लायन्स क्लब ऑफ अलिबागचा इंडक्शन आणि इन्स्टॉलेशन समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी सीए लायन के.एल. परमार, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अनिल जाधव यांच्या उपस्थितीत अलिबाग लायन अध्यक्षपदी प्रदीप नाईक, सेक्रेटरीपदी महेश कवळे, तर ट्रेझरर अमोघ किंजवडेकर, फर्स्ट व्हीपी महेश चव्हाण या नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांना कार्यकर्तृत्वाची शपथ देण्यात आली.
या सोहळ्यातील प्रमुख उपस्थितांमध्ये रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, विजय वनगे, झोन चेअरपर्सन विकास पाटील, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, नयन कवळे, प्रियदर्शनी पाटील, मावळत्या अध्यक्ष गौरी म्हात्रे, अंकिता पाटील, शिल्पा कवळे,डॉ रेखा म्हात्रे, अविनाश राऊळ, रमेश धनावडे, नितीन शेडगे, नितीन अधिकारी, रोहन पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, डॉ. चंद्रकांत वाजे, श्रीकांत ओसवाल, अनिल आगाशे, परेश भतेजा, अभिजित आमले, रणजित जैन, विद्या अधिकारी, अतुल वर्तक, सीमा शेडगे, संतोष सागवेकर यांच्यासह अलिबाग क्लबचा भव्य लायन परिवार, अलिबाग डायमंड्स, नागाव, किहीम, पोयनाड, मुरुड आणि इतर लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांसह दोनशेहून अधिक लायन्स उपस्थित होते.






