| कोलाड | प्रतिनिधी |
पुगाव आदिवासीवाडी येथून राहत्या घरातून दोन अल्पवयीन मुलांसमवेत आई बेपत्ता झाल्याची घटना घडली. कोलाड पोलिसात संदीप वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिता संदीप वाघमारे, क्षुतिका वाघमारे, सूरज वाघमारे हे पुगाव आदिवासी वाडी येथे राहत असून, 8 जून रोजी पती संदीप वाघमारे घरी नसताना, पत्नी अनिता वाघमारे कुणालाही न सांगता आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन घरातून निघून गेली. कोलाड पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फोजदार श्रीधर अधिकारी करीत आहेत. तरी परिसरात महिला व दोन अल्पवयीन मुले कुणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कोलाड पोलिसांनी केले आहे.







