। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बिरदोले गावाला देशाच्या स्वतंत्र लढ्याचा इतिहास आहे. या गावी स्वातंत्रदिनाच्या औचित्यावर देशाच्या स्वतंत्र लढ्यात कार्यरत असलेल्या आझाद दस्तामधील क्रांतिकारक यांचे कार्य मोठे आहे. या आझाद दस्ताची आठवण रहावी म्हणून बिरदोले गावात आझाद दस्ताची माहिती देणारे नामफलक येथील जिल्हा परिषद शाळेत लावण्यात आला. देशाच्या स्वतंत्र लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कारदेखील यावेळी करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नरेश कालेकर तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णु कालेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दिनेश कालेकर,सुदाम कालेकर, गुरुदेव जामघरे, भगवान जामघरे, रूपेश जामघरे, प्रदीप कालेकर, कुणाल कालेकर, यशवंत कालेकर, दुदा जामघरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी फोफेकर तसेच शिक्षण विभागाच्या दहिवली मालेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख गजानन म्हात्रे आदी उपस्थित होते.







