| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा-नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले असून, मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याची माहिती टीमला मिळताच, ही टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली. पावसाची तमा न बाळगता अतिशय मेहनत घेऊन या झाडाचे तुकडे करून हा बाजूला केला व वाहतूक सुरळीतपणे सुरु केली. सतत तीन-चार दिवसांपासून टीम विविध घटनास्थळी जाऊन मोलाचे सहकार्य करीत असून, त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्याचे विविध स्तरावरून आभार मानले जात आहेत.







