| माथेरान | प्रतिनिधी |
देवावर असलेली श्रध्दा आणि दृढ विश्वास याच अनुषंगाने गणेशभक्तांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीय असल्याने येथील माजी नगरसेवक शिवाजी शिंदे आणि त्यांचे बंधू उद्योजक भास्करराव शिंदे यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना प्रत्येकी दहा किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले. गोकुळ रेस्टॉरंट याठिकाणी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, ज्ञानेश्वर बागडे, नितीन शहा, आदेश घाग, हेमंत पवार, विठ्ठल पवार, सचिन सोरटे, अमोल काळे, वैभव पवार, अमोल चौगुले, वसंत कदम, महिला आघाडीच्या सुहासिनी दाभेकर, कामिनी शिंदे, मंदाकिनी तुपे, अंकिता तोरणे, सुमन पवार, पुष्पा कदम, रिझवाना शेख, गिरीजा शिंदे, शुभांगी शिंदे यांसह असंख्य गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.






