| पनवेल | वार्ताहर |
दुचाकीसोबत त्यावर ठेवलेल्या 40 डिलिव्हरी पार्सलची चोरी केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ष अहमद हा तळोजा फेस 2 येथे राहत असून, शॅडो फिक्स या कंपनीत पार्सल डिलिव्हरीचे काम करतो. तो दुचाकीवरून पार्सल देण्यासाठी आसावरी सोसायटीत गेला होता. त्याने पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि पार्सल देण्यासाठी बिल्डिंगमध्ये गेला. मात्र, तेथून तो परत आला तेव्हा त्याची दुचाकी तसेच त्यावर ठेवलेले 20 हजार रुपये किमतीचे 40 पार्सल गायब असल्याचे त्याला आढळले. त्याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



