। अलिबाग । प्रतिनिधी ।
विसर्जनासाठी गेलेलया एका 45 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी घडली. ही घटना झिराड येथील असून, रोहा रेस्क्यू टिमच्या मदतीने मृतदेह बुधवारी सायंकाळी बाहेर काढण्यात यश आले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन मंगळवारी सायंकाळी झिराड येथील तलावात सुरू होते. अनिल बुधा नाईक (45) रा. आदिवासीवाडी झिराड हा ठाकुर आळी येथील तलावात गणेशमुर्ती विसर्जन करण्याचे काम करीत होता. त्याला पोहता येत होते. गणेशमुर्ती विसर्जन करुन पाण्यात पोहत असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचा तलावात शोध घेण्यात आला. परंतु, तो मिळाला नाही. रोहा येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. अखेर बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावात आढळला. मृतदेह सायंकाळी बाहेर काढण्यात यश आले.






