| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेसह पनवेल महानगर पालिकेचा प्रारुप आराखडा जाहीर झाला आहे. आपल्याला ताठ मानेने उभे राहण्यासाठी या निवडणुका जिंकाव्या लागणार आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तयारी करायची आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद आजही अबाधित आहे. सध्या असलेल्या प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांनी केले.
पुढे बाळाराम पाटील म्हणाले की, जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्यांचा ओघ वाढणार आहे. तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून रोहापर्यंत जिल्हा स्थिरावणार आहे. त्यामुळे जिल्हयातील 15 तालुक्यांना बुथस्तरावर निटनेटके काम करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मत चोरीचा प्रश्न गंभीर आहे. त्याचे षडयंत्र पोलादपूरपासून कर्जत, पालीमध्ये होऊ शकते. यावर अंकुश ठेवण्यासाठी मतदार याद्या तपासून घेणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. निवडणूक प्रक्रीया सुरु होण्यापुर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करायचे आहेत. तरच सत्याच्या मार्गाने निवडणूक येण्याची अपेक्षा आहे, असे माजी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले.







